30-12-2018 - 30-12-2018

water hyacinth free Pawanamai swach v sunder दिनांक :- २९/१२/२०१८ विषय :- जलपर्णीमुक्त व नालेमुक्त स्वच्छ सुंदर पवनामाई अभियान ( उगम ते संगम ) रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आयोजित जलपर्णीमुक्त व नालेमुक्त अभियान (उगम ते संगम ) हा उपक्रम मागील वर्षी ५ नोव्हेंबर २०१७ ते ५ जून २०१८ -२१५ दिवस सातत्याने पवना नदीवरील २४ किलोमीटर पात्रातील जलपर्णीमुक्तीचे शास्त्रोक्त पद्धतीने काम केले आहे व १४५५ ट्रक जलपर्णी पात्रातून बाहेर काढली आहे, तसेच दुसऱ्या पर्वात ७ ऑक्टोबर २०१८ पासून आजवर पुन्हा रोजच सदरचे काम चालू आहे, या परिणामस्वरूप कामाचा रविवारी ३० डिसेंबर २०१८ रोजी ३०० वा दिवस सहभागी असणाऱ्या सर्व निसर्गप्रेमी वा ९६ सामाजिक संस्थांसोबत सकाळी ९ ते ११ या वेळात रावेत बंधारा येथे श्रमदानाने साजरा करणार आहोत तरी आपली उपस्थिती व मार्गदर्शनाची आम्हास आवश्यकता आहे, आपण आमच्या विनंतीचा स्वीकार करून उपस्थित राहावे हि नम्र विनंती. आपला विनीत रो.प्रदीप पोपटराव वाल्हेकर संस्थापक अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी

Project Details

Start Date 30-12-2018
End Date 30-12-2018
Project Cost
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 0
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Water and sanitation