14-04-2019 - 14-04-2019

जिओ और जिने दो.. संदेश दिला त्याने मानवजातीला...चला जलपर्णीमुक्त पवनामाई करून आपण ही जीवदान देऊ लाखो जलचरणांना.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान महावीर जयंती निमित्त रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आणि पिंपरी चिंचवड जैन महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने जलपर्णी मुक्त सांडपाणी विरहित स्वछ सुंदर पवनामाई अभियान 💡आपल्या पवना नदी मध्ये सांडपाणी मिसळीत होत असल्याने नदी पात्राला जलपर्णी चा विळखा बसला आहे, ह्या जलपर्णी च्या आवरणा मुळे नदीच्या पाण्यात सूर्यप्रकाश पोहचत नाही आणि त्यामुळे नदी पात्रातील मासे, कासव, आणि अनेक जलचर ऑक्सिजन च्या कमतरतेने मरण पावत आहेत. 🔈मागील दीड वर्षपासून आपल्या भागात रोटरी क्लब ऑफ वाल्हेकर वाडी च्या पुढाकाराने चालू असलेल्या पवना नदी अभियानामुळे नदी पात्र जलपर्णी मुक्त आणि सांडपाणी मुक्त होण्यास मदत होत आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे नदीपात्रात मासे आणि इतर जलचराचे प्रमाण वाढीस लागले आहे. 🎯चला तर आपण ही ह्या अभियानात सहभागी होऊन जीवसृष्टी संवर्धन करण्यास मदत करूया. ⏳रविवार 14 एप्रिल 2019 सकाळी 8 ते 11 वाजता 🏝 केजुबाई बंधारा, बोट क्लब थेरगाव

Project Details

Start Date 14-04-2019
End Date 14-04-2019
Project Cost
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 0
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Others, Water and sanitation