20-06-2021 - 27-06-2021

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांच्या वतीने स्नेहछाया आश्रम व मस्ती कि पाठशाला यांना रेशन धान्य किट चे वाटप रोटरी क्लब ऑफ निगडी यांच्या अनमोल सहकार्याने आज रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी च्या टीम ने दिघी येथील पालावरच्या मुलांना एकत्र करून त्यांना शिक्षण प्रवाह मध्ये आणणाऱ्या श्री. इंगळे सरांच्या स्नेहछाया आश्रम व बांधकाम मजुरांच्या मुलांसाठी रावेत येथे शाळा चालवणाऱ्या सौ. प्राजक्ता रुद्रवार यांच्या मस्ती कि पाठशाला या शाळांमधील विद्यार्थ्यांना, बांधकाम मजुरांना क्लबतर्फे आज रेशन धान्य किट चे वाटप करण्यात आले यावेळी विद्यमान प्रेसिडेंट श्री. सचिन काळभोर सेक्रेटरी श्री. सचिन खोले यांच्या सोबत संस्थापक अध्यक्ष रो. प्रदीप वाल्हेकर, रो. शेखर अण्णा चिंचवडे,रो. सोमनाथ हारपुडे, रो. सुभाष वाल्हेकर, रो. सुधीर मरळ, रो. वसंत ढवळे, रो.रामेश्वर पवार, सहगामी व रोटरी क्लब वाल्हेकरवाडीच्या सदस्य सौ. प्राजक्ता रुद्रवार, सौ. केतकी नायडू उपस्थित होत्या. या उपक्रमास रोटरी क्लब ऑफ निगडीचे माजी अध्यक्ष श्री. विजय काळभोर, विद्यमान अध्यक्ष डॉ. प्रवीण घाणेगावकर, श्री. मुकुंद मुळे, श्री. राजापूरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी या दोन्ही प्रकल्पातून या मुलांना विविध नामंकित शाळांमध्ये यावर्षी प्रवेश घेऊन दिल्याबद्दल दोन्ही प्रकल्प चालकांचे रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी च्या वतीने कौतुक करण्यात आले.

Project Details

Start Date 20-06-2021
End Date 27-06-2021
Project Cost 51000
Rotary Volunteer Hours 32
No of direct Beneficiaries 220
Partner Clubs Rotary Club of Nigdi
Non Rotary Partners
Project Category Basic education and literacy